Tag Archive | marathi vinod

ईयत्ता चवतीचा वर्ग

ईयत्ता चवतीचा वर्ग.

मास्तर येक डोला दरवाज्याकड लावुन शिकवत होते.

ईंन्स्पेक्टर आले.

शिकवल्याप्रमान पोर ऊटली.

‘ येक सात नम ~~~~ स्ते’ ‘

बसा बसा मुलांनो .’ ईंन्स्पेक्टर म्हनला.

‘ मास्तर, तूमच्या वर्गातल्या सगळ्यात हुशार मूलाला ऊभ करा.

मी त्याला गणितातील काही प्रश्न विचारतो .’

‘ मिथन्या ऊट . ‘ मास्तर.

मी ऊबा रायलो .

४७ मार्क घेऊन सहामाईत पयला आल्तो

बोल. ‘ १७ गुणिले ८ कीती होतात ?’ ईंन्स्पेक्टरन ईचारल.

‘ अं …अं …’ माजी हातभर ……… .

मना त १० परयंतच पाडे येत वते.

‘ येकशे चालीस ‘ मी ठोकल.

‘ एकशे चाळिस ? मास्तर हा तुमच्या वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा ना ?

हा चक्क एकशे चाळिस सांगतो .?’ ईंन्स्पेक्टर आवाक झाल्ता.

‘ सर आवो हा मिथन्या हूशारच हाय.

बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान .’

ईंन्स्पेक्टर पयली चक्कर आली.

ईंन्स्पेक्टरच आ केलेल तोंड बंद नाय झाल तवर मास्तरनी ईचारल ‘ सर मूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय.

म्हणायला सांगू ?’ ‘ सांगा.’ ईंन्स्पेक्टरन तोंड मिटल.

‘ चंद्रकांत ऊट .

भाषण कर.’

मास्तर न आदेश दिला.

चंद्या ऊटला न भाशनाला सुरवात केली.

‘ मत्मा गांधी च पुर्न नाव मोहनदास करमचंद गांधी .

२ आक्टोबर ला पोरबंदर हीत गांधीजीचा जन्म झाला.

गांधीजीचे बालपन खुपच गरीबीत गेले.

ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले.

ते समजल्यावर वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई.

आपले शालेतील शिक्शन पुर्न करुन ते विलायतेला गेले.

तीते त्यानी वकीलीच शिक्शन झेतल.

आनी ते भारतात परत आले.

भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला.

पन तो काय चाल्ला नाय मग ते आफ्रिकेत गेले.

तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला.

पनतो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले.

काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला.

तो चाल्ला .

मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले

व थोड्याचदिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.’

ईंन्स्पेक्टरला पुडच कायव आयकायला गेल नाय.

तो आरवा झाल्ता. :) :)

 

 

शंभराच्या पाच नोटा

नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’

मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’

नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे.’

डायमंड रिंग

गण्या (मन्या ला) : मी माझ्या दीदी च्या नकळत

गर्लफ्रेंड ला दीदीची नवीन डायमंड रिंग गिफ्ट

केली….

मन्या गण्याला एक चापट मरतो आणि म्हणतो,

‘अबे….किती महागाची होती ती….तीन महिने पैसे

वाचवून खरेदी केली होती मी….’

गण्या : मग एवढ्या जोरात मारायची काय गरज

होती????

तुझ्याच घरात तर गेली आहे रिंग

चड्डी

बरे झाले ‘डॉलर’ नावाचीच चड्डी येते….

चुकून माकून ‘रूपया’ नावाची असती तर

दिवसभर चड्डी पकडूनच फिरावे लागले
असते…..

किती वेळा ती घसरण ???

टोपीवाला

एक टोपीवाला गावातून जात असतो,

तो दमतो,

म्हणून झाडाखाली विश्रांती घेतो…

उठून पाहतो तर झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात…

त्याला आजोबांची गोष्ट आठवते…

तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने आपटतो…

पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण करत नाहीत….

उलट १ माकड दात दाखवून बोलतो,

“काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते का???”

कोंबडीचे पिलू

चिमणराव : काय रे बंड्या मी तुला कोंबडीच्या पिलाला दाने द्यायला सांगितले
तर तू मांजरीला का दाने देत आहेस ?

बंडू : अहो मी कोंबडीच्या पिलालाच दाने देत आहे……

चिमणराव : खोटे बोलतोस का रे बंड्या कोंबडीचे पिलू कुठे आहे इथे ?
बंडू : मांजरीच्या पोटात

एसएमएस

नवर्याने
रात्री उशिराबायकोला एसएमएस
केला
तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझे आयुष्य
धन्य झाले…
माझ्यासारख्या नवर्याला सांभाळून
घेतल्याबद्दल धन्यवाद…
तू महान आहेस…
बायकोचे उत्तर आले…
.
.
.
..
.. किती पेग झाले…

सासू

एकदा एक सुन खुप रडत असते …
तिची सासू विचारते ” काय झालं ?”
सुन :- “सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?”
सासू :- ” नाही बाळा, अजिबात नाही.”
.
.
सुन :- ” माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?”
सासू :- … ” नाही ग, अजिबात नाही…”
.
.
सुन :- ” मी काय चापट्या नाकाचीआहे?”
” कोण म्हणालं, अजिबात नाही….”
.
.
सुन :- ” मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?”
सासू :- ” छे छे अजिबात नाही …”
.
.
सुन :- ” मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात

पूल

एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला.

सगळे गावकरी म्हणाले , ‘ वा , हे चांगलं झालं. ‘

संता – हो ना ,

पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची.

आता सावलीतून पोहत जाता येईल.

गंपू: किती मुश्कील आहे यार टीचर शी प्रेम करणे

झंम्पू: का रे ???

.
..

….

गंपू :अरे २५ पानांचे प्रेम पत्र लिहिले

तर वेडीने
assignment समजून खाली sign केली

आणि वरून कॉमेंट
पण लिहिली कि अक्षर सुधरावे

आणि चक्क १० पैकी ७
मार्क पण दिलेत.

%d bloggers like this: