वाक्याचा भावार्थ

परीक्षेतील प्रश्न –
.
पुढील वाक्याचा भावार्थ लिहा.
.
बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत,
पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला ?
.
एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ –
लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात,
पण.. सरस्वतीला नाही. म्हणूनच आपण आपल्या
मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..

पोटगी

(कुटूंब न्यायालयात )

न्यायाधीश :
दोन्ही बाजू नीट तपासून पाहिल्यानंतर मी तुझ्या बायकोला दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे …

गण्या :
खूप खूप धन्यवाद जजसाहेब…
आपण खूप दयाळू आहात .

जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा

मीदेखील तिला थोडेफार पैसे देत जाईन.. !!!

परीक्षा शब्दाचा नवीन अर्थ

_पुणेरी फटका_

*परीक्षा शब्दाचा नवीन अर्थ*

“मन लावून अभ्यास करून *परीक्षा* दिलीस तर कदाचित *परी* मिळेल नाहीतर *रिक्षा* आहेच”

अंतरातम्याचा आवाज

जेंव्हा तुमच्या अंतरातम्याचा आवाज तुम्हाला सोडून सगळ्यांना ऐकू जातो
त्याला
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

घोरणे म्हणतात.

लग्न आणि शास्त्र

तुम्हाला माहिती आहे काय.?

15 आँगष्ट आणि 26, जाने.ला लग्न तिथी च नसते..!

कारण 15आँ. ला श्रावण व 26 जाने.ला बहुतेक पौष महीना असतो.

यादोनही महिन्यात लग्न करु नये असं शास्त्र आहे.

खरं कारण हे की….स्वातंत्रदिनी तुम्हाला पारतंत्रात ढकलायला नको
आणि 26जाने ला तुमच्या या घटनेची जबाबदारी कोण घेणार..?

पण…….1 मे ला मात्र बरेच जण लग्न बंधनात अडकतात कारण तो आहे ….
“कामगार दिवस”

कोथिंबीर

*वडील (रागाने)* :- एक काम धड होतं नाही तुझ्याकडून , तुला “कोथिंबीर” आणायला सांगितली होती पण तू “पुदीना” घेऊन आलास. तुला कोथिंबीर आणि पुदीन्यातला फरक कळत नाही? चल चालता हो घरातून.. तू काही कामाचा नाहीस.

*मुलगा* :- चला बरोबरच जाऊ घरातून..

*वडील* :- का ?

*मुलगा* :- कारण की ….

आई म्हणते की ही *मेथी* आहे..

वेडे मित्र

दोन वेडे मित्र होते….

एकदा त्या दोघांची रस्त्यावर गाठ पडते ….

एक वेडा म्हणतो की , सांग बघू माझ्या या पिशवी मध्ये काय आहे आणि तू जर हे सांगितलंस तर यातील सगळी अंडी तूला…!

आणि तू जर हि अंडी किती आहेत हे सांगितलंस तर आठीच्या आठी तूला ….!

आणि तू जर ती अंडी कश्याची आहेत हे जर सांगितलंस तर कोंबडी तूला..

आणि दुसरा वेडा म्हणतो की. काही तरी ‘Options’ दे की.

प्रयोग

*बायको :* कुठे आहात ?
आज आपल्याला बाहेर डिनरला जायचं आहे, उशीर होतोय.

*नवरा :* मी माझ्या टिम सोबत एक महत्वाचा प्रयोग करण्यात व्यस्त आहे.

*बायको :* कसला प्रयोग ?

*नवरा :* आम्ही एका विशिष्ट थंड तापमानात C2H50H गरम (व्हिस्की) मध्ये H2O (पाणी) व तरल पदार्थ Sodium Bicorbonate (सोडा) यांचे मिश्रण केले आहे. आणि ह्या मिश्रणाचे तापमान अजून 0 डिगरी मध्ये आणण्यासाठी त्यात H2O (बर्फ) चे गोल तुकडे काही मात्रेत टाकले आहेत आणि आता आम्ही काहीतरी Protein (चणे, शेंगदाणे, काजू, तंदुरी) तत्वांची वाट बघत प्रयोग शाळेचे वातावरण Nicotine (सिगरेट) च्या वाफेने सुगंधीत करीत आहोत. ह्या प्रयोगाला कमीत कमी 3 ते 4 तास लागतील आणि मी ह्या प्रयोगाचा हेड आहे त्यामुळे यायला उशीर होऊ शकतो. तुम्ही जेवून घ्या.

*बायको :* Oho… So Sorry.. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवा.
मी माझ्यासाठी खिचडी बनवून
खाईन. तुम्ही पण काहीतरी मागवून खाऊन घ्या…

डोकेदुखी

एका माणसाला संध्याकाळी कामावरुन घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात.

डॉक्टर : काय म्हणताय?

डोकेदुखी कशी आहे आता?

माणूस : बाहेर फिरत आहे…. हळदीकुंकुसाठी…..!

चिमटा

पति-पत्नी एका गच्च गर्दी असलेल्या बस मधून प्रवास करत होते…

योगायोगाने पतीसमोर एक सुंदर स्त्री असते व ते तिला चिटकुन् उभे असतात, स्वाभाविकपणे हे पाहून पत्नी फार जळत असते !

अचानकपणे ती सूंदर बाई फिरली व तिने पतिदेवाच्या कानाखाली एक जोरदार चपराक लावली!
“लाज नाही वाटत परस्त्रीला चिमटा काढायला!”

बसमधुन उतरल्यावर
पति : खरेच मी नाही ग चिमटा काढला..

पत्नी: अर्थपूर्ण नजरेने पाहत हसत बोलली
“आणखी चिटका ??? कसा गाल रंगला “

%d bloggers like this: