दु:ख

एक माणूस बारमधे एकटाच दु:खी मनस्थितीत पित बसला होता.

थोड्या वेळाने त्याचा एक मित्र त्याच्याजवळ जात म्हणाला, ” काय मित्रा.. फार दु:खी दिसतोस … काय झालं?”

” माझी आई ऑगस्टमधे वारली, ” तो म्हणाला.

” अरे रे” त्याचा मित्र दु:ख व्यक्त करीत म्हणाला.

” बिचारी माझ्यासाठी 2.5 लाखाची इस्टेट सोडून गेली” तो माणूस पुढे म्हणाला.

” मग सप्टेबर मधे माझे वडील वारले” तो म्हणाला.

” अरेरे लागोपाठ दोन महिण्यात दोन घरातली माणसं गेली … फारच वाईट झालं” त्याचा मित्र म्हणाला.

” बिचारे माझ्यासाठी 9 लाख रुपए सोडून गेले” तो माणूस म्हणाला.

” आणि मागच्या महिन्यात माझी काकु मला सोडून गेली”

” अरेरे फारच वाईट झालं” त्याचा मित्र म्हणाला.

” ती माझ्यासाठी 1.5 लाख रुपए सोडून गेली ” तो माणूस म्हणाला.

” घरची तिन माणसं लागोपाठ तिन महिण्यात … खरंच किती वाईट गोष्ट” त्याचा मित्र म्हणाला,

” आणि इतका दु:खी होवून तु एकटाच पित बसला आहेस… याही महिन्यात कुणी गेलं की काय?” त्या मित्राने विचारले.

” नाही ना या महिण्यात कुणीच गेलं नाही … त्याचंच तर खरं दु:ख आहे” तो माणूस म्हणाला.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: