उशीर

मानमोडे- मे आय कम इन सर?
बॉस- येस, कम इन.
मानमोडे- सर, थोडा उशीर झाला सर.
बॉस- थोडा म्हणजे किती?
मानमोडे- अर्धा तास.

बॉस- आणि जास्त म्हणजे किती हो?
मानमोडे- …………..
बॉस- उशीर का झाला?
मानमोडे- सर, गाडय़ा लेट होत्या.
बॉस- तुमच्याच कॉलनीत राहणारा रडे वेळेवर कसा आला मग?
मानमोडे- सर, तो लवकर निघतो.
बॉस- म्हणजे तुम्ही उशिरा निघता?
मानमोडे- नाही सर, पण..
बॉस- पण काय?
मानमोडे- त्याचं काय आहे सर, आमच्याकडे पाणी सकाळी येतं ना!
बॉस- किती वाजता?
मानमोडे- पाच वाजता.

बॉस- मग?
मानमोडे- सर, पाणी मलाच भरावं लागतं.
बॉस- रडे पाणी भरत नाही का?
मानमोडे- माहीत नाही सर. पण तो कपडे धुतो..
बॉस- तुम्हाला कसं कळलं?
मानमोडे- तो रोज कपडे पिळून गॅलरीत सुकायला टाकत असतो सर.
बॉस- त्यांची गॅलरी तुमच्या फ्लॅटमधून दिसते का?
मानमोडे- होय सर.

बॉस- आणि तुमचं किचन त्यांच्या बेडरूममधून दिसतं?
मानमोडे- बरोबर सर, पण तुम्हाला कसं माहीत सर?
बॉस- ते महत्त्वाचं नाही, पण तुम्ही अनेक वेळा स्वैपाक करताना, भांडी घासताना दिसता.

मानमोडे- तशी मिसेसला स्वैपाकात थोडी मदत करतो सर.
बॉस- काय मदत करता?
मानमोडे- हेच सर, भाजी चिरून देणं, तांदूळ निवडून देणं, कधी कधी तिचे हात दुखत असतात मग पीठही मळून द्यावं लागतं.
बॉस- हात दुखत असतील तर त्या चपात्या कशा लाटतात?
मानमोडे- नाही सर.. म्हणून बऱ्याच वेळा मलाच चपात्या लाटाव्या लागतात.

बॉस- म्हणजे तुम्हाला स्वैपाक करावा लागतो?
मानमोडे- नाही सर स्वैपाक तीच करते.
बॉस- तुम्हीच तर सर्व करता, मग मिसेस काय करतात?
मानमोडे- सर, तांदूळ निवडून दिले की ती भात कुकरला लावते, भाजी चिरून दिली की ती फोडणीला घालते, पीठ मळून दिले की..
बॉस- अच्छा, म्हणजे ती तुम्हाला मदत करते!
मानमोडे- हो सर. आम्ही एकमेकांना मदत करतो सर. पण रडेइतकं मला अजून जमत नाही सर.

बॉस- काय?
मानमोडे- हेच सर.. लेडीज ड्रेसना इस्त्री करणे, डोक्याला मेंदी लावणे.
बॉस- रडे हेच म्हणत होते.
मानमोडे- काय?
बॉस- तुमच्या काही गोष्टी त्यांना अजून जमत नाहीत म्हणून.
मानमोडे- म्हणजे?
बॉस- म्हणजे तुम्ही चांगलं हेड मसाज करता म्हणे.
मानमोडे- हो ना सर, रडेच्या डोक्यावर केस होते तेव्हा त्यांना केलं होतं मसाज.
बॉस- म्हणजे आता तुमच्या कलागुणांचा तसा मलाही काही उपयोग नाही.
मानमोडे- हो ना, बरोबर ओळखलंत सर. हेच तर तुमच्यात आणि रडेमध्ये साम्य आहे.आणि त्यामुळेच तुम्ही दोघेही वेळेवर येऊ शकता आणि मला थोडा उशीर झालाय सर. सॉरी, आता जाऊ द्या ना..

बॉस- जा! पण पुढच्या वेळेपासून वेळेवर येत चला .

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: