” रावणाला कोणी मारला ?”

एक शिक्षण अधिकारी
एकदा एका शाळेत गेला
सहजच एका वर्गात शिरला,
एक साथ नमस्ते – सारा वर्ग बोलला.
बसा, मुलांनो बसा – अधिकारी म्हणाला.

” रावणाला कोणी मारला ?” – ऐसा प्रश्न् विचारला
सारा वर्ग शांत शांत जाहला
प्रश्न् पुन्हा एकदा विचारला
“मी नाही मारला, मी नाही मारला – प्रत्येकजण बोलला

अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला –
“रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?”
मास्तरांनी खुलासा केला –
आमचा विद्यार्थी साधा भोळा
गांधी अहिंसा ठाऊक त्याला
कशाला कोण मारेल रावणाला ?
अधिकारी आणखी वैतागला,
मुख्याध्यापकांकडे गेला,
झाला प्रकार सांगितला,
“रावणाला कोणी मारला ?
विद्यार्थी सांगत नाहीत” – म्हणाला

मुख्याध्यापक म्हणाले –
“शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?”;
“जर शाळेच्या आवारात मारला तर बघतो एकेकाला
जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?”

Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: