बीएसएनएल, डोक्याला शॉट………..

डोक्याला शॉट…………..

“हॅलो, बीएसएनएल का ? ”
” हो, बोला ”
” अहो ब्रॉडबँड बंद पडलेय “

” तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे”
” का हो ? ”
” टेक्निकल प्रॉब्लेम” खाSSड फोन बंद
*****

…” हॅलो, बीएसएनएल ? ”
” दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत ”
” काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे”
” नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? ”
” एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात ”
” काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? ”
” काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच ” खाSSड फोन बंद
*****

“हॅलो बीएसएनएल ?”
” बोला ”
” तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना ”
” हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी ”
” मी तुमची काही मदत करू शकतो का ? ”
” तुम्ही टेलिकॉम वाले का हो ? ”
” नाही, पण मी थोडं सुचवू शकतो ”
” सांगा की साहेब ”
” तुम्ही ना ! चार-पाच मांजरी पाळा वाटल्यास मी एक देतो…. फुकटात ”
खाSSड फोन बंद
*****

“हॅलो बीएसएनएल ? ”
” बोला ”
” अहो मघाशी फोन केलेला मी ते मांजरीचं तेवढं …”
” अहो साहेब कशाला मस्करी करता ? मांजरी पाळल्यानं काय होणार आहे ? ”
” अहो त्या उंदीर खातील ना ! त्या काही केबल खात नाहीत ”
” आणि मग मांजरी बाहेर कशा काढायच्या ? ”
” कुत्रे देतो ना दोन, चांगले गलेलठ्ठ ”
“च्यायला…… “खाSSड फोन बंद
*****

” हॅलो बीएसएनएल ? ”
” हे बघा तुम्हीपण मांजर पाळायचे सल्ले देणार असाल तर…. ”
” नाही हो, कुणी दिला होता का असला सल्ला ? ”
” नायतर काय साहेब, इथे आमची हालत झालेय आणि लोकांना मस्करी सुचते”
” तुम्ही सध्या काय प्रोटेक्शन घेताय ? ”
” आँ, कसलं ओ कसलं ? ”
” अहो एक्स्चेंज साठी म्हणतोय मी ”
” चालू आहेत प्रयत्न ”
” मी सर्व्हिस देऊ का ? ”
” काय करता आपण ? टेलिकॉम मध्ये आहात का ? ”
” नाही हो, सर्पमित्र आहे ” खाSSड फोन बंद
*****

” हॅलो बीएसएनएल का ? ”
” तुम्हीपण सर्पमित्र आहात का ? ”
” का ? तुम्ही आहात ? ”
” नाही हो, मघाशी कुणीतरी त्रास देत होतं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ? ”
” अहो नेट बंद आहे गेले चार दिवस ”
” एक्सचेंजमध्ये उंदरांनी वायर चावल्यानं बंद पडलंय ते, काम चालू आहे”
” पण मी काय म्हणतो, ”
” बोला ”
” तुम्ही केबलना उंदराचं औषध लावून ठेवा म्हणजे बघा की उंदीर पडलेला असेल तिथेच शोधायची केबल ”
” तुम्ही तेच कालचे का हो ? ”
” नाही मी उंदीर मारायचं औषध विकतो एकदम जहाल आहे बघा उंदीर फूटभर पण लांब जाऊ शकत नाही ”
” ……. ” खाSSड फोन बंद
*****

” हॅलो बीएसएनएल ? ”
” नेट चालू झालेय ”
” मी विचारत होतो तुमच्याकडे एखादी कादंबरी किंवा डीव्हीडी आहे का हो ? ”
” हे टेलिफोन एक्सचेंज आहे लायब्ररी नाही ”
” नाही त्याचं काय आहे ते नेट ….. ”
” सांगितलं ना चालू झालंय ”
” हो तेच ते पण ते किंचित स्लो आहे, मला एक मेल पाठवायचंय तर ते लिहून पूर्णं होईपर्यंत तेवढाच टाईमपास एखादी कादंबरी वाचून झाली असती हो ”
” आयची…. ”
*****

” हॅलो बीएसएनएल ? ”
” आता नेट व्यवस्थित चालू आहे ”
” ते माहीताय मला पण.. ”
” पण काय ? ”
” तेवढा उंदीर सापडला का ते विचारायचं होतं ”

हल्ली म्हणे बीएसएनएल त्या कॉलरला शोधतायत म्हणे, त्याचं कनेक्शन बंद करण्यासाठी.

Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: