ईयत्ता चवतीचा वर्ग

ईयत्ता चवतीचा वर्ग.

मास्तर येक डोला दरवाज्याकड लावुन शिकवत होते.

ईंन्स्पेक्टर आले.

शिकवल्याप्रमान पोर ऊटली.

‘ येक सात नम ~~~~ स्ते’ ‘

बसा बसा मुलांनो .’ ईंन्स्पेक्टर म्हनला.

‘ मास्तर, तूमच्या वर्गातल्या सगळ्यात हुशार मूलाला ऊभ करा.

मी त्याला गणितातील काही प्रश्न विचारतो .’

‘ मिथन्या ऊट . ‘ मास्तर.

मी ऊबा रायलो .

४७ मार्क घेऊन सहामाईत पयला आल्तो

बोल. ‘ १७ गुणिले ८ कीती होतात ?’ ईंन्स्पेक्टरन ईचारल.

‘ अं …अं …’ माजी हातभर ……… .

मना त १० परयंतच पाडे येत वते.

‘ येकशे चालीस ‘ मी ठोकल.

‘ एकशे चाळिस ? मास्तर हा तुमच्या वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा ना ?

हा चक्क एकशे चाळिस सांगतो .?’ ईंन्स्पेक्टर आवाक झाल्ता.

‘ सर आवो हा मिथन्या हूशारच हाय.

बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान .’

ईंन्स्पेक्टर पयली चक्कर आली.

ईंन्स्पेक्टरच आ केलेल तोंड बंद नाय झाल तवर मास्तरनी ईचारल ‘ सर मूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय.

म्हणायला सांगू ?’ ‘ सांगा.’ ईंन्स्पेक्टरन तोंड मिटल.

‘ चंद्रकांत ऊट .

भाषण कर.’

मास्तर न आदेश दिला.

चंद्या ऊटला न भाशनाला सुरवात केली.

‘ मत्मा गांधी च पुर्न नाव मोहनदास करमचंद गांधी .

२ आक्टोबर ला पोरबंदर हीत गांधीजीचा जन्म झाला.

गांधीजीचे बालपन खुपच गरीबीत गेले.

ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले.

ते समजल्यावर वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई.

आपले शालेतील शिक्शन पुर्न करुन ते विलायतेला गेले.

तीते त्यानी वकीलीच शिक्शन झेतल.

आनी ते भारतात परत आले.

भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला.

पन तो काय चाल्ला नाय मग ते आफ्रिकेत गेले.

तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला.

पनतो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले.

काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला.

तो चाल्ला .

मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले

व थोड्याचदिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.’

ईंन्स्पेक्टरला पुडच कायव आयकायला गेल नाय.

तो आरवा झाल्ता. 🙂 🙂

 

 

Advertisements

टॅगस्, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: