एक मराठी कथा

रामू ज्या घरात घरकाम करायचा,त्या घराच्या मालकाच्या व्हिस्कीच्या बाटलीतील एक -दोन पेग पोटात रिचवायचा.आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी ओतायचा.मालकाला त्याचा संशय तर यायचा.पण तरीही त्यांनी त्याला काही म्हटले नाही.रामूचे हें कारनामे रोजचेच बनले होते. एके दिवशी मालक आपल्या पत्नीसोबत ड्राइंग रुममध्ये बसले होते.त्यांनी तेथूनच मारली किचनमध्य असलेल्या रामूला जोरात हाक मारली.
मालक(ऒरडून) :- रामू $$$
रामू (किचनमधून):- ‘ काय मालक..’
मालक :- ‘माझ्या बाटलीतून व्हिस्की काढून कोण पित आहे ?’
किचनमधून काहीच उत्तर येत नाही.
मालकाने पुन्हा तोच प्रश्न विचारला.पण रामूने काहीच उत्तर दिले नाही.
मालक रागातच किचनकडे गेले आणि रामूला म्हणाले,
‘हे काय चाललय ? मी तुला हाक मारली तर ओ देतोस,पण पुढच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाहीस.असे का?’
रामू :- ‘मालक या किचनचे एक वैशिष्ठ्य आहे.कीचनमध्ये फक्त नाव ऐकायला येते .बाकी काहीच ऐकू येत नाही.’
मालक :- ‘हे कसे शक्य आहे? ठिक आहे .आता मी किचनमध्ये थांबतो आणि तू मला ड्राइंग रुममधून प्रश्न विचार.मग बघ मी तुला उघडा पाडतो ते.’
रामू ड्राइंग रुममध्ये मालकीनीच्या बाजूला उभा राहून जोरात ओरडतो.
रामू :- ‘मालक$$$’
मालक :- . ‘हां बोल रे रामू.’
रामू :- . ‘ आपल्या कामवाल्या बाईला नवीन मोबाईल कोणी घेवून दिला ?’
किचनमधून काहीच उत्तर आले नाही.
रामू :- . ‘ तिला कारमध्ये बसवून फिरायला घेवून कोण गेले होते?”
किचन पुन्हा शांतच…
मालक किचनमधून ड्राईंग रुममध्ये आले आणि म्हणाले…
.
.
.
‘अरे ,हा तर खराच चमत्कार आहे.किचनमध्ये फक्त नावच ऐकायला येत आहे ,बाकी काहीच ऐकू येत नाही.’   

Source:-
Facebook

Advertisements

One response to “एक मराठी कथा”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: