Archive | विनोदी चुटकुले RSS for this section

आवडते कवी

एका अट्टल दारुड्याला प्रश्र्न
विचारला…
तुमचे आवडते कवी कोण?

दारुडा – मंगेश पाडगावकर.

अरे वा ….त्यांची कोणती कविता आवडते?

“झोपाळ्या वाचून झुलायचे”

अच्छे दिन

अच्छे दिन आने वाले है…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अहो आपले नाहित,
कोंबडीं चे
कारण आता श्रावण सोमवार सुरु होत आहेत…

चप्पल

एका जाड बाईने चोर
पकडला आणि त्याचावर
बसली.
आणि नँतर
नोकराला सांगते ,
“जा आणि पोलिसाला बोलवुन
आण” ….
.
नोकर- माझी चप्पल
सापडत नाय आहे………
.
.
.
.
.
.
चोर ओरडुन- अर yedpat माझी चप्पल घाल
पण लवकर जा…

शिट्टी

एक पोपट आणि त्याचा मालक
विमानाने प्रवास
करायला निघाले …
Air Hostess बाजूने जात
असताना..
पोपटाने शिट्टी वाजविली..
तर
तिनेस्माईल केले
ते बघून मालकाने पण
शिट्टी वाजविली.
तर तिने complaint
केली आणि शिक्षा म्हणून
दोघांना विमानातून फेकून द्यावे असे
ठरले.
पोपटाने मालकाला विचारले
उडता येतेका………?
मालक : नाही….
पोपट: मग…
शिट्टी कशाला
वाजविली…..रताळ्या ….

सखाराम

एकदा एक दारूड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो.

वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एकजण दारात
उभ्या असलेल्या महिलेला विचारतो ,
‘सखारामाचं घर हेच
का ?’
‘होय ‘ ती महिला उत्तरते.
‘मग आमच्यापैकी सखाराम कोण आहे ते ओळखून त्याला घरात
घ्या.

होईल तोटा….पण पाटिल मोठा

पाटलाचा मुलगा मुंबईला शिकायला जातो….
घरी पत्र पाठवतो….

प्रिय बाबा,
स.न.वि.वि.
मी इथे मजेत आहे. कॉलेजला जातो , परंतु मला वाईट वाटते की माझे मित्र ,सर सगळे दररोज लोकल ट़्रेनने येतात व मि आपल्या स्काॅरपिओ मधुन जातो… ..

बाबांचा रीप्लाय,

प्रिय बाब्या,
वाईट वाटुन घेऊ नकोस सकाळीच पैसे पाठवतो लोकल ट्रेन घेऊन टाक… कुठेही कमी पडायचे नाही …

होईल तोटा….पण पाटिल मोठा

भाडं

रिक्षावाला – 50 रुपये झाले
जोशी – हे घे 25 रुपये
रिक्षावाला – हि काय दादागिरी
जोशी – बरोबर आहे .
तु पण आलास ना रिक्षात बसुन
मग काय तुझ भाड मिच भरू?

मुलगा

चम्प्या – चिंगे मला आपला मुलगा सुन्दर व्हायला पाहिजे.

चिंगी – एक गोष्ट क्लिअर करा.
मुलगा सुन्दर पाहिजे की आपला पहिजे.

प्रोसिजर

पुणेरी बँकेतला किस्सा :

ग्राहक – “आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल??”

कारकून -” ३ दिवसांनी”

ग्राहक – “”अहो बँक समोरच तर आहे…..फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ ??”

कारकून – “अहो ती प्रोसिजर आहे….. समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील ??”

‘पी टीव्ही’ आणि ‘बार प्रवाह’

अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी ‘पी टीव्ही’ ‘बार प्रवाह’ अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नवे काय असतील?

* रम मिनिस्टर
* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती
* पिऊ बाई पिऊ
* बार विकत घेणे आहे
* बारचं पाऊल
* बाटलीचा प्रियकर तो (मानसीचा)
* माझिया दारुचा पेग संपेना
* बार तिथे मी

%d bloggers like this: