Archive | विनोदी चुटकुले RSS for this section

कडक शिक्षा

गणपतराव: कायहो, वसंतरावतुमची बायको सकाळी सतार घेऊन कोठे गेली?

वसंतराव: कारागृहामध्ये तिचा गाण्याचा कार्यक्रम आहे ना.

गणपतराव: असं होय, सरकारने कैद्यांची शिक्षा आणखी कडक करायची ठरवलीयं तर!

शंभराच्या पाच नोटा

नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’

मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’

नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे.’

टोपीवाला

एक टोपीवाला गावातून जात असतो,

तो दमतो,

म्हणून झाडाखाली विश्रांती घेतो…

उठून पाहतो तर झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात…

त्याला आजोबांची गोष्ट आठवते…

तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने आपटतो…

पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण करत नाहीत….

उलट १ माकड दात दाखवून बोलतो,

“काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते का???”

उखाणा

बंडू आणि चिंगीच लग्न झालं,
तेव्हा बंडूने चिंगीसाठी घेतलेला उखाणा…..
“गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
माझी बायको आहे मोठी लुच्ची…..”
हे ऎकुण मग चिंगी ने रागवून नाव घेतले…….
“झेंडूचे फुल हलते डुलू डुलू,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलू…..”

चकमक

एकदा नवरा बायकोची जोरदार
चकमक होते.

नवरा घायाळ होऊन निघून
जातो.

पण शेवटी नवराच तो.
त्याला बायकोची दया येते.

संध्याकाळी तो बायकोला फोन
करतो.

नवरा : अगं, आज जेवणात
काय मेनू बनवते आहेस?

बायको : विष.

नवरा : चालेल. हो, पण आज
मला घरी यायला उशीर
होईल.

तेव्हा तू ते खाऊन
झोपी जा. वाट नको बघूस
माझी.

अती शहाणा त्याचा बैल रिकामा…

पुणे रेल्वे स्टेशनवर एक तरुण सोलापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला.

ज्या डब्यात तो चढला, त्या डब्यात खूप गर्दी होती. म्हणून याने शक्कल लढवली.

मोठ्या-मोठयाने तो साप साप म्हणून ओरडू लागला. डब्यातले सगळे लोक भीतीने खाली उतरले.
हा मात्र मोठ्या रुबाबात डब्यातल्या एका सीटवर जाऊन तोंडावर पेपर ठेवून झोपी गेला.

जवळपास दीड-दोन तासाने त्याला जाग आली. तसा तो उठला आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या माणसाला त्याने विचारलं,
“कोणतं स्टेशन आलं हो ?”

माणूस म्हणाला, “पुणे स्टेशन.”

“काय? पुणे स्टेशन?”,
तो तरुण गोधळून म्हणाला.

“होय, या डब्यात साप होता, म्हणून गाडी हा डबा इथेच सोडून सोलापूरला गेली,”
. . . .
तात्पर्य : अती शहाणा त्याचा बैल रिकामा…

पुण्यातील चितळे यांची McDonalds ची agency

पुण्यात चितळे यांना McDonaldsची agency मिळाल्यावर पुणेरी पाटी कशी असेल?

1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.

2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात.
(टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)

3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.

4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.

5. टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.

6. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.

7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही.
(लहान साईज: १७ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)

8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय.
(व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)

9. पहिल्या दहा मिनिटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिनिटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत.

10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.

11. विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत.

12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.

14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.

15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत.
(ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)

16. आमची कुठेही शाखा आहे !
(पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)

17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.

18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.

~ हुकूमावरून

डाळ

बायको – अहो ऐकलंत का ? आज घरी पाहुणे जेवायला येणार आहेत. आणि मी तर फक्त डाळ बनवलीय.

नवरा – मग असं कर…पाहुणे आले की किचनमध्ये भांडं पाडल्याचा आवाज कर. मी विचारल्यावर सांग , भाजी सांडली. थोड्या वेळाने अजून एक भांडं पाड. मी
विचारेन मग सांग पुलाव सांडलाय. मग काय ते निघून जातील.

थोड्या वेळाने पाहुणे येतात. किचनमधून आवाज येतो.

नवरा – काय गं , काय झालं ?

बायको – ( रडवेल्या आवाजात) काही नाही…डाळच सांडली.

लव मँरेज

गण्या:”आई, लव मँरेज केल्याने घरचे नाराज
होतात का..?”
.
.
आई:”तु नक्की कोणत्या तरी भुतणिचा चक़कर
मध्ये पडलाय,
आणि हे सगळ तुला त्याच डायन ने सांगितल
असेल….
.
मुली फक्त मुलाना फसवायची काम करतात रे
गण्या…
जिथे चांगला मुलगा दिसला कि लगेच चालु
पडतात….
,
गण्या माकडा मुलीँपासुन जरा सांभाळुन
रहा त्या फार खतरनाक असतात
आणि त्याँचा परिवार पण तसाच असतो ……”
.
.
.
गण्या:”बस आई अस काय नाय आहे,
ते बाबा सांगत होते की तुमच पण लव मँरेज झाल
आहे.

जेव्हा वीज जाते

अमेरिकेत जेव्हा घरातली वीज जाते,

तेव्हा तिथली लोकं लगेच पॉवर हाऊसला फोन करतात आणि प्रॉब्लेम समजून घेतात.

जपानमध्ये जेव्हा घरातली वीज जाते, तेव्हा तिथली लोकं लगेच फ्युज तपासतात आणि लगेच बदलून घेतात.

भारतात जेव्हा वीज जाते, तेव्हा इथली लोकं शेजाऱ्यांच्या घरी डोकावतात आणि म्हणतात…. सगळ्यांचीच गेलीय ना… मग जाऊ देत!

%d bloggers like this: