Tag Archive | कुठे

शिव हरी….शिव हरी…..

यात्रेला जाणाऱ्या तरुण यात्रेकरूंच्या एका टीमला त्यांच्या गुरुनी सांगितले,
“हे बघा, प्रवासात एखादी सुंदर मुलगी दिसली तर
विचलित होऊ नका.. लगेच डोळे मिटून तीन वेळा,
“शिव हरी” म्हणा..!”
… बऱ्याच प्रवासानंतर नदीवर आंघोळ करताना एक जण ओरडला,
… … … … “शिव हरी.. शिव हरी.. शिव हरी..”
लगेच बाकीचे सर्व,
“कुठे आहे.. कुठे आहे.. कुठे आहे..!

कोलंबसची बायको

कोलंबसची बायको मराठी असती तर त्याला कधीच अमेरिकेचा शोध लावता आला नसता.

कारणः

बायकोः “कुठे चाललात?

कोणाबरोबर?

कसे जाणार?

काय शोधायला जाताय?

जायलाच हवं का?

इकडे कुठे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

तुमचे मित्र बरोबर असतीलच ना?

मी इथे एकटी काय करू?

मीपण येऊ का?

नाहीतर असं करा, मला माहेरी सोडा आणि जा.

परत कधी येणार?

माझ्यासाठी काय आणणार?”

कोलंबसः “चायला मरू दे! नाही जात!!”

त्रिशूळ

शंकर- अगं माझा त्रिशूळ कुठे गेला?
पार्वती- चिरंजीवांनी घेतलाय…
शंकर- कशाला???
पार्वती- आज मॅगी चा नेवैद्य दाखवलाय कोणीतरी……..!!!