Tag Archive | विचार

विचार बदला.. आयुष्य बदलेल..

मित्र :- मला ही मुलगी आवडली.

दुसरा :- अरे पण तिला आधीच बॉयफ्रेंड आहे.

मित्र :- हे बघ मित्रा, फुटबॉलच्या मैदानात नेहमी गोलकिपर असतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण गोल करू शकत नाही.

विचार बदला.. आयुष्य बदलेल..

मनातले विचार

एक मुलगा आणि मुलगी प्रथम भेटतात तेव्हा त्यांच्या मनातले विचार,
मुलगी : किती साधा आहे..
मुलगा : काय माल आहे यार..
मुलगी : स्वभाव पण छान आहे
मुलगा : पटली तर मजा येईल..
मुलगी : कपड्याचा sense पण चांगला आहे..
मुलगा : स्कर्ट मध्ये जास्त hot दिसेल…
मुलगी : लग्नासाठी विचारलं तर पटकन हो म्हणीन..
मुलगा : फक्त एकदा हो म्हण.. मला कुठे लग्न करायचं.

गम्मत

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .

बायको :-मग ????

नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..

बायको :-विचार करा ..

द्रौपदीला ५ नवरे होते..

नवरा :- sorry..
गम्मत केली ग 🙂

पुरुषाचा जन्म कित्ती छान!!

पुरुषाचा जन्म कित्ती छान!!

महिलांनो, विचार करा पुरुषाचा जन्म किती सुखाचा!
तुम्ही पुरुष असलात तर…

१. तुमचं आडनाव बदलत नाही.
२. तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही.
३. वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता.
४. वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता.
५. बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात.
६. स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही.
७. बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो.
८. गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात.
९. लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात.
१०. तुमचा एक मूड बराच काळ टिकतो.
११..तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही.
१२..पाच दिवसांच्या सुटीसाठी बाहेर जाताना फक्त
एका सुटकेसमध्ये सामान मावतं.
१३ .तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता.
१४ .कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता.
१५..पादत्राणांचे तीन जोड पुरतात.
१६ .बिनधास्त शॉर्ट वापरू शकता.
१७ .तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची संपूर्ण
कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता.
१८ . तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही.
मित्रानो, प्रत्येक गोष्टीत स्त्रियांना आपण कमी लेखतो….

थरकाप

थरकाप

एक माणूस मुंबई हून पुण्याला गाडी घेऊन निघाला होता.
त्याने विचार केला कि आपण जुन्या रस्त्याने जरा निसर्ग बघत जावूया.

तो ज्यावेळी डोंगरावर पोहोचला त्यावेळी त्याची गाडी बंद पडली.
तो आता अश्या ठिकाणी होता जिथून त्याला काहीही जवळ न्हवतं.
थोड्याच वेळात अंधार पडला आणि पाऊस सुद्धा चालू झाला.
रात्र पुढे सरकत होती पण त्या रस्त्याने कोणी सुद्धा जात न्हवतं.
… … अचानक एक गाडी त्याच्याकडे येताना त्याला दिसली.
त्यांनी काही विचार न करता गाडीत पाठीमागच्या सीटवर बसला आणि धन्यवाद करण्यासाठी तो पुढे सरकला.
आणि पाहतो तर काय?
समोर कोणीच नाही..पण गाडी मात्र चालत होती.
गाडी सरळ चालायची आणि वळणावर ज्यावेळी असे वाटायचे कि आता गाडी धडकतेय त्या वेळी अचानक एक हात खिडकीतून समोरून यायचा आणि गाडी वळवायचा.
तो खूप घाबरला.
त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. देवाकडे सतत प्रार्थना करू लागला.
अचानक एका वळणावर त्याला एक उजेड दिसला.
गाडी हळू झालेली पाहून पटकन गाडीतून उतरला आणि सरळ त्या उजेडाकडे धावत सुटला.
तो एक छोटा धाबा होता.
धाब्यावर जावून पाणी प्याला आणि तो सर्व लोकांना त्या खतरनाक अनुभवाबद्दल सांगू लागला.
धाब्यावर गाढ शांतता पसरली. आणि इतक्यात संता आणि बंता तेथे आले.
संता त्या माणसाकडे बोट दाखवून बंताला म्हणाला
‘ हाच बघ तो वेडा जो आपल्या गाडीत बसला होता ज्यावेळी आपण ती ढकलत होतो’. 😀 😀

ताजमहल बनवायचय ?


नशिब माझं फळत नाही
लग्नं कुठं जमत नाही
बरचं शोधलं
मुमताज कुठं मिळतं
नाही

डोकं खाजवलं विचार
केला
झटपट वधु वर
मेळाव्यात गेलो
आता बऱ्‍याचं प्रयात्नाने
नशिब फळफळलं
लग्नं जमलं
बँड वाजला
लग्नं थाटात धामधुमीत
पार पडलं

मुमताज वर प्रेम करत
लग्नाची पन्नाशी गाठली
अर्थात हाफ सेंच्युरी
तरीही ताजमहल काही
बनत नाही

कारण ……

मुमताज अजुन मरत नाही ………….

मुमताज अजुन मरत नाही ……………

तो आणि ती


तो आणि ती दोघेही मनोरुग्ण…. एकाच इस्पीतळात ……

इस्पीतळात ज्या दिवसा पासून भेटले होते तेव्हा पासूनचं

त्यांच्यात एक बंध निर्माण झाला होता…. सार्‍यांना त्याचे अप्रूप वाटे…

सारा दिवस ते सोबतचं असायचे… एकमेकांशी कधीचं बोलत नसत…

निशब्द….. जणू त्यांचे मन एकचं होते म्हणून त्यांना शब्दांची गरज नसावी….

असेचं रोज सारखे आजही ते इस्पीतळाच्या आवारात मूकपणे फिरत होते…

चालता चालता ते स्वीमींग पुल पाशी आले… काय झाले कुणास ठावूक…

त्याने तीचा हात झटकला आणि पळत जाउन पाण्यात उडी मारली…

ना बाहेर येण्यासाठी धडपड्ला….. ना तरंगण्यासाठी हात पाय मारले

त्या पाण्याच्या तळाशी जावून स्थिरावला …. आत्महत्या करत असावा तो बहुतेक…

हे पाहून क्षणातच ती ने सुध्दा पाण्यात उडी मारली….

त्याची मान पकडून त्याला लागलीच बाहेर घेवून आली… त्याचा जीव वाचवला…

दूसर्‍या दिवशी डॉक्टर आले…हे सगळे पाहून…ऐकून….

त्यांनी तीला त्वरीत हॉस्पीटल मधून सुटी देण्याचे फर्मावले….

कारण आता ती बरी झाली होती…. तीचे मन स्थीर झाले होते ती विचार करु शकत होती…

डॉक्टरांनी तीला बोलावले आणि म्हणाले

” तुझ्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे”

तीच्या चेहर्‍यावर तसेचं शांत भाव होते… डोक्टर पुढे म्हणाले

” चांगली बातमी ही की तुला Discharge देण्यात येत आहे कारण

काल तु जे केले त्यावरुन तु आता जबाबदार झाली आहे आणि

तु आपल्या प्रेमाच्या व्यक्तींची काळजी घेवू शकते. तुझी कालची कृती

वेड्या माणसाची असूच शकत नाही म्हणून तु आता बाहेरच्या जगात जाण्यासाठी मुक्त आहे…

वाईट बातमी अशी की…. तो काल तु ज्याला वाचवले… तो मेला

त्याने रात्री काल रात्री स्वतःला पंख्याला टांगून घेतले…..”

हे सांगताना डॉक्टरांचे डोळे पाणावले ….. त्यांनी तीच्या कडे पाहीले…

ती अजूनही तशीच शांत होती……मग म्हणाली

” त्याने स्वतःला नाही टंगून घेतले… तो ओला झाला होता ना

म्हणून लवकर वाळावा यासाठी मी त्याला

पंख्याला टांगले………
.
.
.
मी घरी केव्हा जाउ शकते ?????

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते.
‘मेरा भारत महान’


“बघतोस काय ? मुजरा कर …..! ”


बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!


”पाहतेस काय प्रेमात पडशिल”


१३ १३ १३ सुरूर


सासरेबुवांची कृपा ”


योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये …आणि …मुलांमध्ये..


बाई(क) च्या मागे नका लागु…माझ्याशी गाठ आहे.