खापर

खापर…..

मुलगी :- देवा, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी करून कमावत आहे, मला हवं असलेलं सगळं मिळविण्याची माझ्यात ताकद आहे, मी जगातल्या सगळ्या गोष्टीत यशस्वी होऊ शकते…

पण, माझे आई बाबा म्हणताहेत की लग्न कर.
देवा मला नवरा नकोय..

देव :- मुली, तू हुशार आहेस, कर्ती आहेस, यशस्वी आहेस, यापुढेही तुला यश मिळतच राहील…

पण काही ठिकाणी तुझ्या हातून चूक होऊ शकते,
तुझा पराभव होऊ शकतो,
तुझ्या वाट्याला अपयश येऊ शकते..

अशावेळी तू कोणाला दोष देशील..?
कुणावर खापर फोडशील..?

त्यासाठी तुला ‘नवरा’ असलाच पाहिजे… नाही म्हणू नकोस

नारळ

मास्टर :-गण्या,उभा रहा…
चल सांग,१० नारळांपैकी 7 नारळ नासले,
तर कितीनारळ राहिले?

गण्या-दहा

मास्तर- कसे काय रे?

गण्या- नासलेले सुद्धा नारळच राहतील ना…
त्यांचे काय फणस होणार का…???

लस

लस टोचून घेऊन घरी आलो

आणि एवढंच म्हणालो,


“खूप चांगली लस दिली नर्सने,

थोडा पण त्रास नाही झाला”!

लगेच आतून आवाज आला,

“बाहेरच्या स्त्रियांनी सुया टोचल्या तरी त्रास नाही होत ,


आणि आमचे शब्द टोचतात यांना “!
🤷‍♂️😬😬🤦‍♂️

पुण्य

रोज, एखाद्या लग्न
झालेल्या माणसाला
हसवावं…

पुण्य लाभतं
म्हणे!!!!.

प्रश्न आणि उत्तर

परीक्षेत जर का तुम्हाला माहीत नसलेले प्रश्न आले

तर तुम्ही परीक्षकांना माहित नसलेली उत्तरं द्या

मान

मान

आजकाल पाहुण्यांच्या “पाया पडालायच” हवं अस काही नाही …..

त्यांना पाहून…

“हातातला मोबाईल बाजूला”.. ठेवणं

हा.. सुध्दा ,

एक प्रकारे “मान दिल्यासारखच” आहे….

ड्राईव्ह

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती.

मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा.

मग काय !

गाडी सुसाट !!

:

आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.

गीतानी कर्ररररकचू्..न ब्रेक दाबला.

:

वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !!

गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले..

आणि…..

:

:

:

:

:

हुश्श…..!!!

:

:

:
:
:
:
:
:
:
:….
गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. व अशाप्रकारे,


गाढवा पुढे….
…………,,,,,, वाचली गीता.

आठवण

माधवराव आणि मालतीच्या दुसऱ्याही मुलीचं लग्न व्यवस्थीत पार पडलं.

वऱ्हाडास निरोप दिल्यानंतर दोघे थोडं निवांत बसले असतांना

माधवराव म्हणाले “तुला आठवतं,

मुली लहान होत्या तेंव्हा तू भांडतांना म्हणायचीस

‘मुलींकडे पाहून इथं राहतेय,

नाहीतर केंव्हाच सोडून गेले असते…….

……. 😜😜😂🤣😁😁

मराठी आधुनिक शिव्या


कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली…


तिने शिवी अशी दिली …


अरे ऐ………………


पेनड्राइव चं झाकण……


पैदाइशी Error……


VIRUSच्या कार्ट्या…..


Excelची Corrupt File……


जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन…….
Delete होउन…….म्हसनात
Install होशिल…….
😂😂😂😂😂😂😂😂

वाईट सवयी

आज दारू सोडून तीन महीने पूर्ण झाले….

रोज सकाळी दहा किलोमीटर वेगात पळणे आणि मग कमीत कमी तीस मिनिटं योगासनं करणं हे रूटीन झालं आहे….

ना चहा, ना कॉफी….

केवळ फळं आणि हिरव्या ताज्या भाज्या त्या पण ऑर्गेनिक….

दुपारी दोन पोळ्या आणि भाजी….

संध्याकाळी थोड़े ड्राय फ्रूट आणि फळं….

मटण तर पूर्ण बंद केलंय….

सगळ्या वाईट सवयी सोडल्यात….

आता फक्त….
थापा मारण्याची सवय गेली की झालं….