Tag Archive | ब्लॉग

दोन कठीण कामे

जगातील दोन कठीण कामे—
(1) आपल्या डोक्यातील
विचार दुस-याच्या डोक्यात
उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील
पैसा आपल्या खिशात
आणणे.
* पहिल्या कामात हुशार
त्याला ‘शिक्षक’ म्हणतात.
* दुस-या कामात हुशार
त्याला ‘व्यापारी’ म्हणतात.

* आणि दोन्ही कामात
हुशार तिला ‘बायको’
म्हणतात.

शिट्टी

एक पोपट आणि त्याचा मालक
विमानाने प्रवास
करायला निघाले …
Air Hostess बाजूने जात
असताना..
पोपटाने शिट्टी वाजविली..
तर
तिनेस्माईल केले
ते बघून मालकाने पण
शिट्टी वाजविली.
तर तिने complaint
केली आणि शिक्षा म्हणून
दोघांना विमानातून फेकून द्यावे असे
ठरले.
पोपटाने मालकाला विचारले
उडता येतेका………?
मालक : नाही….
पोपट: मग…
शिट्टी कशाला
वाजविली…..रताळ्या ….

सखाराम

एकदा एक दारूड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो.

वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एकजण दारात
उभ्या असलेल्या महिलेला विचारतो ,
‘सखारामाचं घर हेच
का ?’
‘होय ‘ ती महिला उत्तरते.
‘मग आमच्यापैकी सखाराम कोण आहे ते ओळखून त्याला घरात
घ्या.

कालांतराने बायकोत झालेला बदल

लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत
झालेला बदल..
:
पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ
झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये
.
दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?
.
तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..
जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा
.
चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,
स्वतःच्या हाताने घ्या
.पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…
बाहेरच काही खाऊन घ्या
.
सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…
आत्ताच तर नाष्टा हादडलाा …

नापास

चंप्याचे वडील : नालायका त्या शेजारच्या जोश्यांची चिंगी पहा जरा पहिली आलीये…. नाहितर तु खुशाल नापास होतोस निर्लज्जासारखा….
.
.
.
.
चंप्या : अजुन किती पाहु… तिला पाहुन पाहुन तर नापास झालो ना….

होईल तोटा….पण पाटिल मोठा

पाटलाचा मुलगा मुंबईला शिकायला जातो….
घरी पत्र पाठवतो….

प्रिय बाबा,
स.न.वि.वि.
मी इथे मजेत आहे. कॉलेजला जातो , परंतु मला वाईट वाटते की माझे मित्र ,सर सगळे दररोज लोकल ट़्रेनने येतात व मि आपल्या स्काॅरपिओ मधुन जातो… ..

बाबांचा रीप्लाय,

प्रिय बाब्या,
वाईट वाटुन घेऊ नकोस सकाळीच पैसे पाठवतो लोकल ट्रेन घेऊन टाक… कुठेही कमी पडायचे नाही …

होईल तोटा….पण पाटिल मोठा

भाडं

रिक्षावाला – 50 रुपये झाले
जोशी – हे घे 25 रुपये
रिक्षावाला – हि काय दादागिरी
जोशी – बरोबर आहे .
तु पण आलास ना रिक्षात बसुन
मग काय तुझ भाड मिच भरू?

मुलगा

चम्प्या – चिंगे मला आपला मुलगा सुन्दर व्हायला पाहिजे.

चिंगी – एक गोष्ट क्लिअर करा.
मुलगा सुन्दर पाहिजे की आपला पहिजे.

वय

मुंगी: एक विचारेन म्हणते.
हात्ती: विचार की.
मुंगी: तुझं वय काय रे?
हात्ती: मी पाच वर्षांचा आहे.
मुंगी: काय सांगतोस काय… फक्त पाचवर्षं
आणि तरी तू एवढा प्रचंड?
हात्ती: हा हा हा… आय अॅम अ कॉम्प्लॅन
बॉय. बरं
मला सांग, तुझं वय काय गं?
मुंगी: माझं वय पण पाच वर्षं
.
हात्ती : अगं पाच वर्षं वय
आणि केवढीशी दिसतेस…
मुंगी: वही तो… आय अॅम संतूर गर्ल.
मेरी त्वचा से मेरी उम्र
का पताहीनही चलता…
हत्ती बेहोश|मुंगी मदहोश..

प्रोसिजर

पुणेरी बँकेतला किस्सा :

ग्राहक – “आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल??”

कारकून -” ३ दिवसांनी”

ग्राहक – “”अहो बँक समोरच तर आहे…..फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ ??”

कारकून – “अहो ती प्रोसिजर आहे….. समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील ??”